*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार आण्णा लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*प्रवास थेंबाचा*
एक दवबिंदू जसा, नभामध्ये लपतो
एक थेंब आईच्या, उदरात झोपतो
एक थेंब ढगातुन, जमीनीवर पडतो
एक जन्म घेऊन, कुशीमध्ये रडतो
एका एका थेंबाने, धरती ओली होते
एकामुळे घर जणु, आनंदून जाते
थेंब थेंब पिऊन, तृष्णा तृप्त होते
एकाला पाहून सारे, दुःख लुप्त होते
एका थेंबाने धरती, नवरी सारखी नटते
एका थेंबाने बाईला, आईची उपमा भेटते
एक थेंब दवबिंदू, होऊन उडून जातो
जन्म मनुष्याच्या एका, थेंबानेच होतो
थेंबामुळे मातीतून, बाहेर पडतो कोंब
आयुष्याचा प्रवास, म्हणजे एक थेंब
*रामदास पवार (आण्णा)*