*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री रेखा दहातोंडे लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*सोबत*
सोबत असावी
सदा चांगल्याची
जीवनाचे सार्थक
पूजा मांगल्याची !
सत्संग धरावा
मधुर भाषण
सुखदुःखातही
करावे रक्षण !
असे सोबतीला
संगीत सुरेल
मनी प्रसन्नता
शांतता लाभेल !
संग पुस्तकांचा
घालवी अज्ञान
मनोरंजनही
करीतसे छान!
आवडीचा छंद
मनी जोपासावा
आनंद आगळा
मिळतसे जीवा !
निसर्ग सोबत
वरदान सारे
करावे रक्षण
सदासर्वदा रे !
क्षणिक सुखाचे
सारेच सोबती
सदैव सांगाती
कोणीच नसती !
सारे विसरून
हसत जगावे
सोबतीला कुणी
असो वा नसावे!
रेखा नामदेव दहातोंडे
अहमदनगर