*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*ओढ*
माणसाला माणसाची ओढ नाही,
भेटल्यावर बोलणेही गोड नाही!
आपले ज्यांना म्हणावे ते विषारी,
त्या विषाला कोणतीही तोड नाही!
राहिलो मी नेहमी सर्वासवे अन्
खेचणे मागे कुणाला खोड नाही!
बिकट होती वाट माझी चालतांना,
घेतला मी एक साधा मोड नाही!
देत गेलो उसनवारी वेळ येता,
गावला कोणीच ना जो झोड नाही!
जो वसा मी घेतला सुर्यापरी त्या,
नित्यनेमे पाळतो धरसोड नाही!
जयराम धोंगडे, नांदेड
9422553369