You are currently viewing वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी मध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 15 उमेदवारांचेच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचेच चित्र आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी तालुक्यातील सर्वपक्षीय सहकारातील पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.


महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ अन्वये वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक 16 डिसेंबर रोजी जाहीर झाली आहे. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक असून नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आज 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून ज्ञानेश्वर शांताराम केळजी, चित्रा मोहन कनयाळकर, विष्णु विठ्ठल फणसेकर, दत्तात्रय भास्कर वजराठकर, गुरुनाथ गजानन मडवळ,प्रकाश महादेव गडेकर व मनिष प्रकाश दळवी यांनी व्यक्तिगत मतदारसंघातून यशवंत लक्ष्मण परब, विजय महादेव रेडकर व महादेव भालचंद्र गावडे यानी महिला राखीव मधून सुजाता संदिप देसाई आणि प्रज्ञा प्रदिप परब यांनी, भटक्या विमुक्त जाती जमाती मधून गणेश विष्णु गोसावी यांनी इतर मागास प्रवर्गामधून जनार्दन रुक्मानंद कुडाळकर यांनी आणि अनुसूचित जाती जमाती मधून महेश लुमाजी परुळेकर यांचा समावेश आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत साळगावकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा