You are currently viewing हळवल फाट्यावर अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करा

हळवल फाट्यावर अपघात कमी होण्यासाठी उपाययोजना करा

– युवा सेनेचे कणकवली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावर सातत्‍याने अपघात होत आहेत. तसेच या अपघातांमध्ये जीवित हानी होत आहे. पादचारी आणि त्‍या भागातील नागरिकांचेही जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे हळवल फाट्यावर अपघातांची मालिका कमी करण्यासाठी उपाय योजना करा अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली.


युवा सेना विभागप्रमुख रोहित राणे यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग नाईक, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अॅड.हर्षद गावडे, उपतालुका प्रमुख राजु राणे, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, कळसुली विभागप्रमुख चंदु परब, युवासेना विभागप्रमुख रोहीत राणे, अरुण राणे, विलास गुडेकर, गणेश राणे, सौरभ सावंत, मधु चव्हान, सचिन राणे, रवी परब, सुभाष परब, विजय परब, जनार्दन डोबकर आदी उपस्थित होते.


निवेदनात म्‍हटले की, महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघात कमी करण्यासाठी त्‍या परिसरात रम्बलर्स बसविण्यात यावेत. हळवल तिठा येथे हायमास्ट बसवला जावा, उड्डाणपुल संपल्‍यानंतर लगेच धोकादायक वळण असल्‍याबाबतचा फलक लावावा. राष्‍ट्रीय महामार्ग विभाग आणि महामार्ग ठेकेदार यांच्याकडून वरील उपाययोजना आठ दिवसांत करून घ्याव्यात अन्यथा आम्‍हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा