*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी कवी लेखक “भोवतालकार” श्री विनय सौदागर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देहप्रिती*
v/v/s…..
पस्तीस तुकडे, सोळा पिशव्या
हेच काय फलीत
तुला मोठं करताना
हाडं घातलीत चुलीत
दारू,तमाशा केला नाही
कुठलंच व्यसन नाही
फ्राॅक तुला घेताना
शिवत होतो बाही
कुठे कमी पडलो असेन
नव्हतोच कमी पडलो
पंख तुला देता देता
तोंडघशी गं पडलो
सुखासाठी निघून गेलीस
तेच मानले मी सुख
नसेल तुला तेव्हा कळली
नराधमाची भूक
काल फ्रीज विकून टाकला
पिशव्या टाकल्यात लांब
‘गळा दाबा’ म्हणते आई
थांबवू कसे सांग
आत्मा मला समजत नाही
देह होता कळला
गाभार्यातील मूर्तीत उगा
देवाला मी पाळला
आई गेली,बाबा गेले
तूही गेलीस लांब
‘तुझी आई’ माझे मूल
सांभाळणे हे काम.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
९४०३०८८८०२