You are currently viewing वीज ग्राहकांची लुट थांबवा त्यांचा अंत पाहू नका, अन्यथा कठीण परिस्थिती निर्माण होईल…

वीज ग्राहकांची लुट थांबवा त्यांचा अंत पाहू नका, अन्यथा कठीण परिस्थिती निर्माण होईल…

सावंतवाडीच्या मेळाव्यात अधिकार्‍यांना इशारा; वीज ग्राहकांशी सौजन्याने वागण्याची मागणी…

सावंतवाडी

अतिरिक्त भार, इंधन भार अशी कारणे सांगुन विज ग्राहकांची लुट करू नका हा प्रकार थांबवा, लोकांना चांगली सेवा द्या, ग्राहक आहेत म्हणून तुम्ही आहात हे तुम्ही विसरू नका, त्यामुळे सर्वांशी सौजन्याने वागा, असे खडे बोल आज येथे आयोजित ग्राहक मेळाव्यात उपस्थित ग्राहकांकडुन वीज अधिकार्‍यांना सुनावण्यात आले. यावेळी लोकांच्या समस्या ऐकुन घेतल्या आहेत. आमच्या स्तरावर असलेल्या समस्या नक्कीच सोडविल्या जातील ग्राहकांना केंद्रबिंदू मानून या पुढच्या काळात काम केले जाईल, अन्य मागण्यांचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावरुन करण्यासाठी केला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता विनोद विरप यांनी दिले.

सावंतवाडी तालुक्यातील विज ग्राहकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी व्यापारी संघटनाच्या माध्यमातून आज येथील श्रीराम वाजच मंदिरच्या सभागृहात विज ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला.

यावेळी यावेळी जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, श्रीपाद चोडणकर, ग्राहक पंचायत अध्यक्ष अनंत नाईक, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सचिव किरण सिध्दये, चित्तरंजन रेडकर, कार्यकारी अभियंता विनोद विरप, उप कार्यकारी अभियंता संदीप भुरे, धर्मराज मिसाळ, द्वारकानाथ घुर्ये, अनंत नाईक, एकनाथ गावडेपुंडलिक दळवी, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, देवेंद्र टेंमकर, सुरेश भुगटे आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी संघाचे सदस्य व ग्राहक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित ग्राहकांनी उपस्थित अधिकार्‍यांकडे प्रश्नाची सरबत्तीच केली. या ठिकाणी विज चोरी नाही, विज गळतीचे प्रमाण अतिशय कमी आहे, बिले शंभर टक्के भरली जातात असे असताना वीज कंपनीचे अधिकारी एखाद दुसरे बिल राहिले तरी कारवाईची धमकी दाखवतात, हा सर्व प्रकार चुकीचा आहे. तर दुसरीकडे वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर कार्यालयाचा आणि अधिकार्‍यांचा फोन बंद असतो. त्यामुळे आयत्यावेळी एखादी समस्या असल्यास सांगायची कोणाला? असा प्रश्न करून येणार्‍या काळात कार्यालयातील दुरध्वनी सुरू राहील यासाठी प्रयत्न करा. त्याच बरोबर अन्य अधिकार्‍यांना आपले दुरध्वनी उचलण्याची सक्ती करा. त्यानंतर अर्धाअधिक ग्राहकांचा राग कमी होईल. सावंतवाडीत लोकांची कायम सहकार्याची भावना असते. मात्र याठिकाणी असलेले काही कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी उध्दट वर्तन करीत असल्यामुळे त्यानंतर अघटीत घटना घडतात. त्यामुळे असे प्रकार पुढे होणार नाहीत. यासाठी अधिकार्‍यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे यावेळी उपस्थितांकडुन सांगण्यात आले. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत अतिरीक्त भार, इंधन भार अशा नावावर विज वितरण कडुन घेण्यात येणारी बिले योग्य पध्दतीेन आकारण्यात यावीत. सर्वसामान्य लोकांना याचा फटका सहन होणार नाही. यासाठी दक्षता घेण्यात यावी, असा सुर यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आला.

या चर्चेत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, दिलीप भालेकर, रमेश बोंद्रे, प्रा. रमेश गोवेकर, श्री. नार्वेकर, बाळा बोर्डेकर, सोमनाथ जिगजींनी, गजानन पेडणेकर, संतोष गावस, गितेश पोकळे, किशोर चिटणीस, सगुण मातोंडकर, बाळा जाधव यांनी सहभाग दर्शविला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा