सावंतवाडी :
महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी च्या माध्यमातून दिनांक 14, 15 आणि 16 रोजी आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला जिल्हाच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिबिराला उपस्थित राहिले. तसेच या शिबिरादरम्यान महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर सांगितल्याप्रमाणे तीन दिवसाच्या कार्य शाळेमध्ये या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केले. अशा तीन विद्यार्थ्यांना पोलीस भरती 2022 – 23 होईपर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यामध्ये प्रथम क्रमांक दीप्ती राणे रेडी द्वितीय क्रमांक -प्राची पोपकर इन्सुलि तृतीय क्रमांक – शुभम लाखे सावंतवाडी या तिन्ही विद्यार्थ्यांना महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी च्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गेले तीन दिवस झालेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्यासाठी महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी च्या माध्यमातून अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे आणि जास्तीत जास्त अधिकारी वर्ग माझे कोकणातून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निर्माण व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे मत ही पेडणेकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून व्यक्त केले आहे.