*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*आनंदकंद*
धुंदीत गात होता, ओला पहाटवारा
उमलून गोड हसला, अंगावरी शहारा
बागेतल्या कळ्यांना, फुलवून कोण गेला?
नाजूकशा कळ्यांचा, केला जरी पहारा
वाटेत कंटकांना, आच्छादिले कशाला
स्वप्नातही फुलांना, मग वाटतो दरारा
मी नित्य पांघरावे, आभाळ चांदण्यांचे
डोळ्यांत साठवावा, सृष्टीतला नजारा
हातात हात आला, कष्टांत साजणाचा
सौख्यास संजनाच्या, मग भेटला किनारा
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.