*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”बालपण”*
सगळ्यात आनंद देणारे ते बालपणं
निरागसता जपणारे सोनेरी क्षणं।।ध्रु।।
मंदिरापर्यंत पोहोचवतात चरण
ईश्वरापर्यंत घेवून जाते आचरण।।1।।
हृद्य आठवणी वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणं
नेत्रां न दिसती जाती मनास स्पर्श करून।।2।।
मनुष्याला अनुभवे येते शहाणपणं
विचार मोठे धन करावे कर्म आचरण।।3।।
स्वैर स्वच्छंद मुक्त असते बालपणं
फिकीर ना कशाची असते अजाणपणं।।4।।
लहानपणं देगा देवा तुकोबांचे मागणं
शिकावे ज्ञानेश्वर बाळकृष्ण यापासून।।5।।
काव्य:श्री अरुण गांगल.कर्जत, रायगड.
पिन-410201.Cell.9373811677.