You are currently viewing स्वार्थाचा बाजार

स्वार्थाचा बाजार

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*स्वार्थाचा बाजार*

जिकडे तिकडे फौज उभी
दिसे मज लाचारांची..
मातीमोल विकतात तत्वे
कमी नाही अशा बाजारांची..

फायद्याचा दिसता व्यापार..
होते सगळीच तडजोड..
मूल्यांना देऊन तिलांजली
भासे सारे गोडगोड.

कोण कोणासाठी राबले
किती उपसले कष्ट..
सुखासाठी खपले किती
विसरून जातात गोष्ट..

वेळ जाताच निघून
माणसं होतात मुजोर..
संकटी मदत केली
त्यांच्यावरच होतात शिरजोर..

तोंडावर आपली असतात
पाठ वळताच विखार
दुनिया म्हणजे चतुरांचे रान
भोळी भाबडी होतात शिकार..

आयुष्य जाते उमजायला
या दुनियेची न्यारी रीत..
कळू लागले सगळं तेव्हा
संपत येते जीवनाचे गीत.

*सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा