१५ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात;भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल यांच्यात होतेय लढत
मालवण
मालवण तालुका खरेदी-विक्री संघाच्या १५ जागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत असून या जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत रामेश्वर नारायण सहकार पॅनेल आणि भाजप पुरस्कृत रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे महाविकास आघाडी पुरस्कृत रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचे प्रमुख म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांनी विजयासाठी कंबर कसली आहे
दरम्यान, शहरी मतदाराबरोबरच ग्रामीण भागातील मतदारांनी महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या उमेदवाराना पाठींबा दिल्याने यावेळी सत्ता परिवर्तन होणारच असा विश्वास
श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचे महेश उर्फ बाळू अंधारी यांनी व्यक्त केला आहे
मालवण तालुका खरेदी विक्री संघासाठी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत टोपीवाला हायस्कूल येथे तीन मतदान केंद्रे निश्चित करून मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी संघाच्या सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल राहिज काम पाहत आहेत. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर हे आहेत. संस्था मतदारसंघातून २९, इतर मतदारसंघातून ३०७२ मतदार निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. विद्यमान संचालकातील माजी अध्यक्ष रमेश हडकर, माजी उपाध्यक्ष सुरेश चौकेकर, कृष्णा चव्हाण, प्रफुल्ल प्रभू अभय प्रभूदेसाई, विजय ढोलम, मनोज लुडबे, मनोज राऊत, सुभाष तळवडेकर, सरोज परब हे पुन्हा नशिब आजमावत आहेत. रात्री उशीरा मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. रविवारी मालवण शहरात खरेदी विक्री संघ निवडणूक आणि निकाल यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे
संस्था मतदारसंघ : श्रीकांत बागवे, अरुण भोगले, कृष्णा चव्हाण, उदय दुखंडे, राजन गावकर, सदाशिव महाभोज, महेश मांजरेकर, चिठ्ठल नाईक, प्रफुल्ल प्रभू अभय प्रभूदेसाई, राजेंद्र प्रभूदेसाई व्यक्ती सदस्य मतदारसंघ : महेश अंधारी, विजय ढोलम, महेश गावकर, गोविंद गावडे, रमेश हडकर, देवानंद लुडबे, मनोज लुडबे, संतोष लुडबे, चंदन पांगे, मनोज राऊत अनुसूचित जाती- जमाती : नागेश अटक, सुरेश चौकेकर इतर मागास वर्ग : कृष्णा ढोलम सुभाष तळवडेकर. भटक्या विमुक्त जाती-जमाती मेघनाद धुरी, अशोक तोडणकर , महिला : साक्षी लुडबे, नीना मुंबरकर, सरोज परब, अमृता सावंत,
परितर्वन निश्चीत बाळू अंधारी
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सहकार आणि बँक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिलेली आहे. परिपूर्ण आणि अभ्यासू असे आमचे पॅनेल असून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने प्रचारात उतरलेले आहेत. ग्रामीण भागातील मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला असून सर्वच्या सर्व जागांवर आम्ही विजयी होवून खरेदी विक्री संघावर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल परितर्वनासाठी मतदार सज्ज झालेला असून आम्हाला त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे विरोधकांचा पराभव दिसून येत आहे, असा विश्वास महेश उर्फ बाळू अंधारी यांनी व्यक्त केला आहे.