अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट ; महामार्ग वाहतूक पोलिसांकडून शोध सुरु
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जानवली साकेडी फाट्या नजीक आज पहाटे कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र गाडीमध्ये चालक किंवा क्लीनर कोणीही आढळले नाही. शहरातील हॉस्पिटल मध्ये चौकशी केली असता कोणीही तशा पद्धतीने अॅडमिट नसल्याचे समोर आले. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला किंवा कोणत्या गाडीला ठोकले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुपदरी रस्त्यावर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर एकेरी वाहतूक चालू आहे. अपघात कसा झाला याबाबत अधिक तपास महामार्ग वाहतूक पोलीस करत आहेत