*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सुभाष उमरकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*जागर*
रात्र काजव्यांची
चांदण्यांना लाजवते
अंधारलेल्या दिशांना
सारी रात्र जागवते ….!!
घेऊन प्रकाशाचे दान
चंद्र झाला प्रकाशित
शाप आला नशिबी
असे पुथ्वीच्या समिप …..!!
मन आतुरलेले
भेट सख्याची घेण्यास
निशाचर झाला भुंगा
बंदिस्त फुलांच्या मिठीत …!!
गंध गंधाळल्या दिशा
वारा फिरे चौहुकडे
नव निर्मितीचा ध्यास
पराग कणांच्या मनात …..!!
आस मनी उद्याची
हर्ष काळजात दाटे
सखीच्या मिलनाची
आहे हुरहुर मनात …..!!
स्वप्न पाहतो पाहतो
रात्र उघड्या डोळ्यांची
जागर करतो स्वप्नपुर्तीचा
रोज साखरझोपेत……!!
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*