You are currently viewing अशीच मी

अशीच मी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

*अशीच मी*

अशीच मी
आहे एक सुगृहिणी
मनाने मानिनी
घराची।।

आहे गृहकृत्यदक्ष
सांभाळते नीट संसार
मुलांवर संस्कार
दक्षतेने।।

बाग फुलवते
गाते गीत आनंदाने
कविता लेखनाने
समाधान।।

सर्व गोतावळा
नातींची आजी प्रेमळ
मायेने जवळ
माझ्या।।

सत्कार्य आचरण
वंचितांची सेवा करते
देव पहाते
तिथेच।।

नित्य कर्तव्यकर्म
आयुष्याची सांज आली
झोळी भरली
समाधानाने।।

अरुणा दुद्दलवार@✍️

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा