ब्रिगेडिअर सुधीर सावंत, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, संजय आंग्रे, माजी जि. प. सदस्य वर्षा कुडाळकर यांची मुख्य उपस्थिती
कुडाळ
माणगाव खोऱ्यातील शिवसेनेच्या बालेकिल्लाला धक्का देत प्रसाद नार्वेकर यांच्या यशस्वी खेळीने बाळासाहेबांच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अनेक कार्यकर्ते या प्रवेशात सहभागी होते. यापुढेही गावागावात जाऊन बाळासाहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व यांच्या माध्यमातून गावागावातून कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे असा निर्धार नेते पदाधिकारी यांनी केला.
माणगाव खोरे हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो. पण आज या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने प्रवेश केला आहे. या प्रवेशांमध्ये माणगाव, पुळास, हळदीचे नेरूर, नानेली, आंबेरी, वसोली या गावातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या पुढेही संपूर्ण माणगाव खोरे पिंजून काढत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाळासाहेबांच्या सेनेत आणणार असल्याची ग्वाही प्रसाद नार्वेकर यांनी दिली.
यावेळी ब्रिगेडिअर सुधीर सावंत, उद्योजक किरण उर्फ भैया सामंत, संजय आंग्रे, तेंडोली माजी जि. प. सदस्य वर्षा कुडाळकर, अनुप्रीती कोचरे, भास्कर राणे, सुनील पारकर, भूषण परुळेकर, प्रसाद नार्वेकर संभाजी निकम, सुभाष राणे, अमित केरकर, अमित कोरगावकर, गणेश पालव, ललित बोगार, दिनेश कोरगावकर, हर्षद कळगुटकर, अमित उर्फ पोलाड लाड, सागर काणेकर, वेदांत भिसे, निलेश धुरी, रुपेश तावडे, गोट्या गायचोर आदी उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्याचा प्रवेशाचा कार्यक्रम राधाकृष्ण हॉल माणगाव तिठा येथील सभागृहात झाला.
माणगाव येथील कार्यकर्त्यांनी भैया सामंत, सुधीर सावंत, वर्षा कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेचे माजी विभागीय अध्यक्ष योगेश उर्फ बंटी तुळसकर यांनी सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला