*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम लेख*
*.फिनिक्स भरारी..*.
*शीर्षक….अंतःस्फूर्ती*
आपण आजवर ऐकत आलो..भरीरी घ्यावी ती फिनिक्स पक्ष्यासारखी,,तो राखेतून उंच गगनात झेपावणारा…याचा अर्थच की काही अशक्य नसते.अंतःस्फूर्तीने,मनोबलाने सगळे साध्य होऊ शकते.फिनिक्स हे सकारात्मक तेचे उदाहरण आहे.
दैवी आपदा,अवर्षण, ओला दुष्काळ ,किती तरी संकटांसमोर आ वासून असतात.पण ज्यांनी मनोधैर्य टिकवलं ते विचारपूर्वक सद्यस्थितीचा सामना करतात.
काळजीपेक्षा कृतीला महत्त्व देतात व कामाला लागतात.
सुधाचंद्रन या सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगनेचे दोन्ही पाय अपघातात गुडघ्यापासून गेल्यावर त्या खचून गेल्या नाही तर कठोर परिश्रमाने व कृत्रिम
पायांवर पुन्हा तेवढ्याच ताकदीने त्यांनी रंगमंचावर पदार्पण करून तो गाजवला!
अपंगांनी एव्हरेस्ट सर केले तर
पाय गमावलेल्या खेळाडूंनी जागतिक स्पर्धेत स्वर्णपदक जिंकले..
चित्रपटस्रुष्टीत तर अशी अनेक उदाहरणे आहेत.गानकोकीळा लता मंगेशकर व भारतरत्न यांनी प्रतिकूलतेवर मात करत आपली गायनकला जोपासून करोडो मनांवर अधिराज्य केले.या सगळ्यांनी प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी जणू विडा उचलला..व प्रचंड मेहनत,निष्ठा,
ध्येयाप्रत जाण्याची मनीषा बाळगून आपआपल्या क्षेत्रात
सुवर्णाक्षरांनी नाव कोरले!
समाजातील सर्वच स्तरात अशा निराशाजनक परिस्थिती वर मात करत,शिक्षण,नोकरी,व्यवसायात नालौकीक मिळवल्याचे अनेकजण आपण बघतोच.
आता तर कोरोना सारख्या भयंकर आजारावरही केवळ सकारात्मक व मनाने खंबीर राहून अनेकजणांनी पुनर्जन्म मिळवला आहे.
असे अनेक फिनिक्स आपल्या अवतीभवती,समाजात, देशात असतात.त्यांचे जीवन बघावे,अभ्यासावे व ती सकारात्मकता आपल्या अंगी बाणवावी….!!
🍃🍃🍁🍃🍃🍁🍃🍃
*लेखन…अरूणा दुद्दलवार@✒️*