वेंगुर्ले :
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, ओरस येथे केल्याबद्दल भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सप्टेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे ग्रामपंचायत व तुळस आरोग्य केंद्रात भाजपाच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही शिबिराचा जवळ जवळ २६० ग्रामस्थांनी सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी करून घेतली होती. त्या शिबिरातील ज्या रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया ओरस येथे जिल्हा रुग्णालयात आॅक्टोंबर मध्ये करण्यात आली. यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील ६० लोकांची मोफत शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून यशस्वी केली. त्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला. जे रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करु शकत नव्हते, त्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा भाजपा च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई यांच्या सोबत भाजपा जिल्हा चिटणीस व माजी सभापती निलेश सामंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले भाजपचे ता.उपाध्यक्ष व कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, तुळस शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, युवा मोर्चा ता.सरचिटनीस नारायण कुंभार इत्यादी उपस्थित होते .