तीन वर्षाची अवामान आधारित फळ विमा रक्कम मिळावी;तहसीलदार यांना विमाधारक शेतकऱ्यांनी दिले निवेदन
सावंतवाडी
नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 20 -21-22 च्या रब्बी हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानाची विमा रक्कम( आंबा काजू )तातडीने मिळावी तसेच नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी महसूल मंडळात समाविष्ट करावे या मागणीसाठी नेमळे गावातील विमाधारक शेतकऱ्यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना बुधवारी निवेदन दिले.नायब तहसीलदार महेंद्र मुसळे यांनी हे निवेदन स्वीकारले.
दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सन 2021 -22 च्या रब्बी हंगामात प्रधानमंत्री फळपीक विमा( आंबा ,काजू )मध्ये सहभागी नेमळे गावातील शेतकऱ्यांना पर्जन्यमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली. मात्र ,या हंगामात तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली नाही 2021 -22 च्या रब्बी हंगामात नेमळे गाव निरवडे मंडळात समाविष्ट करण्यात आला.
निरवडे मंडळात हवामानाची नोंद घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली नाही. अशी यंत्रणांना न बसवल्याने शासन आणि विमा कंपनीने आमची घोर फसवणूक केली आहे. पर्जन्यमानापासून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली आहे .ही नुकसान भरपाई कोणत्या मंडळाच्या सांख्यकीय माहितीच्या आधारावर देण्यात आली त्याची माहिती मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
तसेच सन 2121 -22 मध्ये झालेल्या तापमान वाढीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सन 2021 22 पूर्वी नेमळे गाव सावंतवाडी मंडळाला जोडण्यात आले होते यंदाच्या रब्बी हंगामात नेमळे गाव पूर्वीप्रमाणे सावंतवाडी मंडळात जोडण्यात यावे अशी मागणी या शेतकऱ्यानी केली आहे नेमळे गाव आंबा पिकासाठी प्रसिद्ध आहे या गावात 70 ते 80 हजार आंबा कलमे आहेत पाऊस आणि तापमान वाढीमुळे आंबा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत आहेत त्यामुळे याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सरपंच विनोद राऊळ ,आंबाशेतकरी गुरुप्रसाद नाईक,वकील अनिल निरवडेकर ,प्रमोद नईक, गजानन राऊळ,लिलाधर राऊळ ,अशोक चव्हाण ,देवेंद्र परब,प्रताप चव्हाण ,बाळा पाटकर,देवीदास रऊळ,बाळकृष्ण राऊळ ,रमेश नाईक,मनोहर राऊळ,एकनाथ राऊळ ,विनोद गाड,हेमंत राऊळ ,सचिन मुळीक,सिध्देश नेमळेकर, सुनील राऊळ आदी उपस्थित होते.