You are currently viewing गेला तुकोबा वैकुंठ निघूनी.

गेला तुकोबा वैकुंठ निघूनी.

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*गेला तुकोबा वैकुंठ निघूनी…*

नाती गोती दिली सोडूनी
मोह माया ही सारी त्यागूनी
रामराम जनाशी करुनी
गेला तुकोबा वैकुंठ निघूनी… १/

इंद्रायनीच्या पाया पडूनी
गाथा सारी आपली पाहूनी
विमामात एकटाच बसूनी
गेला तुकोबा वैकुंठ निघूनी… २/

घ्या नावं जन त्याचे मागूनी
किर्ती गेलो तो मागे सोडूनी
गाव देहू हे शेवटी उजळूनी
गेला तुकोबा वैकुंठ निघूनी… ३/

आक्रोश जनाजनात करुनी
रडते जनता धायधाय करुनी
काय उपयोग पश्चाताप करुनी
गेला तुकोबा वैकुंठ निघूनी… ४/

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

 

प्रतिक्रिया व्यक्त करा