रत्नागिरी :
नाशिक येथे ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या Reseal.in कँपनीच्या महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड २०२२ कार्यक्रमात रत्नागिरी च्या “तनिषा शेअर मार्केट अकॅडमी” ला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शेअर मार्केट अकॅडमी हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ह्या कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध अभीनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या तर्फे महाराष्ट्रातील उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. “रिसील” या चित्रपट निर्मिती संस्थेद्वारे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील यशस्वी व्यावसायिकाना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
आज प्रत्येकाला नवीन व्यवसाय करायचा आहे. पण अपुरा वेळ कमी भांडवल ह्यामुळे खूप लोक व्यवसाय करत नाहीत. पण शेअर बाजार ही अशी जागा आहे जिथे तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायात शेअर मार्फत अगदी कमी भांडवल गुंतवून व्ययसाय सुरू करू शकता. शेअर बाजार ही अशी जागा आहे तिथे तुम्ही तेजी आणि मंदी दोन्हीकडे संधी शोधू शकता. नोकरी करून तुमच्या गरजा पूर्ण होतील पण व्ययसाय करून तुमची स्वप्न पूर्ण होतील असे तनिषा शेअर मार्केट अकॅडमीचे सेबी रजिस्टर रिसर्च अँनलिस्ट नितीलेश पावसकर यांनी सांगितले.