खारेपाटण :
खारेपाटणमध्ये आज बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. नवीन युवा पिढी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत येत आहे. शेतकरी कामगार आणि कष्टकरांच्या हिताचे काम मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. खारेपाटण हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि महामार्गवरील गाव आहे. बचतगट, फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून स्थानिकांनी आपला विकास साधावा असे आवाहन माजी खा. सुधीर सावंत यांनी केले. खारेपाटण विभागाच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि किरण सामंत यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खा. सावंत यांच्या हस्ते सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आग्रे, भास्कर राणे, सुकांत वरुणकर, गुरू शिंदे, मंगेश गुरव, चिन्मय शिंदे, संकेत लोकरे, शरद वायंगणकर, महेश राणे, सुनील पारकर, भूषण परुळेकर, शेखर राणे, उपस्थित होते.