*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*प्रियतमा माझी की चंद्राची !*
नवोदित चंद्र किरणांनी
सागराला फेसाळलं
नववस्र धारण केलेल्या
चंद्राला किना-यास ओढलं…!
इष्ट गंधाने ओंजळभर
पाण्यांत चंद्र भिजला
स्पर्शाने गौर गालावर
हळूवार उतरू लागला …….!
प्रिया माझी की चंद्राची !
सागरी माझ्यासवे आली
माझ्यातली नजर काढून
चंद्राच्या मुखाकडे वळवली …!
प्रियकराचे प्रतिबिंब प्रियतमेला
बिंबाच्या मुखावर दिसले
काय करू अन् काय नाही
अंगी रोमांच उभे राहिले ……!
अमृत तुषारांचे सिंचन
तिच्या मुखावर आले
कवेत चंद्राला ओढत
आकाश गाढ झोपले………!
माझ्या प्रियतमेला चोरणारा
तो रोज संध्येला उगवतो
अन् मवाल्यासारखा तिची
समुद्रावर वाट पहात राहतो ..!
ती येते,त्याला बघते
गोड हसून लाजते
प्रियतमा माझी की चंद्राची
रोजचचं ती त्याचीच होवून जाते .!!
बाबा ठाकूर