*काव्य निनाद साहित्य मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ कविता वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*एका वाऱ्याची झुळूक*
होती सुंदर सकाळ
कैक वेड्या पाखरांची
तृणावरील मोत्यासम
झळाळत्या दवबिंदूची
रोपट्यांतून धावणारी
होती झुळूक वाऱ्याची
आंब्याच्या मोहोरामध्ये
गोंजारणाऱ्या स्पर्शाची
आलाय आनंदाचा
माझ्या मनात पूर
छेडले गेले त्यामध्ये
तृप्ततेचे बेधुंद सूर
पडता दृश्य माझ्या
नयनांवर सुमधुर
मिटले माझ्या मनी
कल्लोळाचे काहूर
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक