वैभव राऊळ, बबन गावडे,अनिल चव्हाण, बुधाजी पाताडे यांची मागणी
आंबोली
चौकुळ चुरनीची मूस येथील रस्ता अत्यंत खराब असून मोठे मोठे खड्डे दगड आणि कच्चा रस्ता यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता मंजूर असून ठेकेदाराच्या बेफिकिरी मुळे लोकांचे हाल होत आहेत याकडे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ, शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे,अनिल चव्हाण,बूधाजी पाताडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून चौकुळ चुरणी ची मूस रस्त्याचे काम मंजूर असून शुभारंभ मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता.मात्र अजून ठेकेदाराचे काम पुढे सरकले नाही.मोरी ला मोठे मोठे भगदाड आहेत.मोठे खड्डे आहेत.पावसाळ्यात ग्रामस्थांची मोठी मुश्किल या रस्त्यावरून होत होती.त्यामुळे या रत्याचे काम तत्काळ सुरू करावे.जर तो ठेकेदार करत नसेल तर दुसरा ठेकेदार नेमून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी चूरणीची मूस ग्रामस्थांची आहे.