*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*बाईपण*
अंधाराची नाही मजला भीती
सूर्य अंतरात मी आहे लपविला
तोडून टाकून पायीची शृंखला
चुकीच्या प्रथांचा नियम झुगारला..
माझ्यात म्हणतात सामावते विश्व
विश्वात मात्र नसते मला स्थान
धुडकावून जुलमी बंधने सगळी
मिळविले मी हक्काचे ठिकाण…
बाईपण जेव्हा अति होते
माणूस म्हणून मी जगू लागते
भीक म्हणून नका देऊ
माझ्या हक्काची मी जागा मागते..
मागूनही हक्क मिळत नाही
मशाल क्रांतीची हाती घेते
मनात ठेवीला जो संकल्प
सर्व शक्तीने तडीस तो नेते…
परंपरा तुमची शूद्र मानणारी
उधळून तुमचे विचार देते
अभिव्यक्तीचे पंख लावून मनाला
आकाश सारे कवेत घेते..
सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337