*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*गरीबी लय वाईट.*
श्रीमंती छान वाटते
तरीबी लय वाईट,
काय सांगू दादा तुले
गरीबी लय वाईट…।
जीव सदा तरसते
खाण्या पिण्यासाठी,
शरीरही तळपते चांगले
वस्त्र घालण्यासाठी..।
नेहमी असते भाऊ
अपुर्णतः जीवनात,
अर्थ काय गरिबाच्या
पशुवत जगण्यात..।
लागत नाहीं अंगाला
कधी प्रतिष्ठेचे वारे,
पोट भरून मिळेना
ताटामध्ये उष्टे सारे..।
गरिबीला दुर ठेवा
होऊ नका दुःखी,
मध्यममार्गी रहा भाऊ
आनंदी आणि सुखी…।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*