*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतीम स्फुटलेखन….*
*जीवन*
मनुष्य जन्माला आल्यापासून तर अखेरचा श्वास घेईपर्यंत चा काळ …..यालाच जीवन म्हणायचं..
खरं तर जीवन एक रंगमंचही…
अनेक भूमिका इथे आयुष्यात साकार कराव्या लागतात….
कधी इतरांना आनंद देण्यासाठी
……तर कधी आपल्या माणसांसाठी….स्वतःचा आनंद शोधण्यात तर अवघं जीवनही
कमी पडतं….
बालपण हुंदडण्यात…..,तारूण्य स्वप्न बघणे आणि त्याच्या पूर्ततेत…जीवनाची सांज ,गडद छाया पसरत येते….तशा संध्या छाया भेडसावू लागतात…..
अशा वेळी आपआपल्या संसारात रमलेली मोठी मुलं
,अभ्यासात गर्क नातवंड,अगदी आपल्या व्यक्तीचा चिरविरह…
मनाचा दाह अधिक वाढवतो…
पण जीवन तर जगायचंच असतं..मग छंद मदतीला धावून येतात,अशावेळी……मैत्री,
वाचन,लेखन,गाणी,अध्यात्म
कुठे तरी मनाचं तादात्म्य केलं की…..
हेच जीवन पुन्हा सुखकर वाटू लागतं……सुखदुःखाच्या या हिंदोळ्यावर झुलत ,सुंदर आठवणींच्या पाऊस धारेत
चिंब भिजावं….स्वतःशीच छानसं स्मित करावं……
आणि आपलं जीवन…..
कृतार्थ करावं……!
********************
*अरूणा दुद्दलवार…..*@✒️✍️