इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी शेतातील तण शोधून ते नाश करणारा रोबोट विकसित केला आहे. सध्यस्थितीत शेती व्यवसायावर अनेक संकटे येत आहेत. मजुरांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने शेतकर्यांवर शेती पडीक ठेवण्याची वेळ येत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन डीकेटीई काॅलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागामधील प्रतिक सावंत, आकाश वाडकर, ओंकार परीट व ॠषिकेश बावडेकर या विद्यार्थ्यांनी प्रा. एस.ए.पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंचलीत तण शोधणे आणि ते तण काढण्याचा रोबोट विकसित केला आहे.सदर विद्यार्थ्यांना प्रा. एस.ए.पोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
डीकेटीई काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी
शेतातील तण शोधून ते नाश करणारा
बनवलेला हा रोबोट सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत तसेच मोबाईल किंवा रिमोटद्वारे नियंत्रित केला जावू शकतो. या रोबोटमध्ये शेतातील छायाचित्रे गोळा करण्यासाठी कॅमेरा वापरला आहे. कृत्रिम बुद्धिमता आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुन चित्रांवर प्रक्रिया केली जाते आणि यामुळे पिक आणि तण वर्गीकरण केले जाते. तण ओळखल्यावर रोबोट हाताने तण उपटून बाहेर काढते. हा रोबोट रोबोटीक आर्म, रास्पबेरी पाई बोर्ड, बक कन्व्हर्टर आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरुन विकसीत केला आहे. रास्पबेरी पाई बोर्ड रोबोट यंत्रणा नियंत्रित करते, बक कन्व्हर्टर रोबोटला शक्ती प्रदान करते तर मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या सहाय्याने तण शोधले जाते. शेतकर्यांच्या समस्येंचा विचार करुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प विकसित केला आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासह विश्वस्तांनी रोबोट तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना प्र.संचालिका प्रा.डॉ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.