आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेच्या रविकिरण तोरसकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यशेतीचा व्यवसाय आज प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्य शेती मधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तरी आज होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील मत्स्य शेतीला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समनव्यक रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नुकतेच मत्स्यबीज निर्मिती करिता लागणारे साहित्य, प्रजनक साठा व मत्स्यबीजाकरिता खाद्य, संप्रेरके, तलाव व्यवस्थापन करिता लागणारे खत, रासायनिक द्रव्य, जाळे, मजुरी, सामग्री पुरवठा, लहान बांधकामे यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन मार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आज होणाऱ्या जिल्हा नियोजनच्या सभेत कार्यवाही करण्याची मागणी विकी तोरसकर यांनी केली आहे.