*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल…श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अभंग रचना*
*भक्तीचा सोहळा*
भक्तीचा सोहळा ! मन मंदीरात !
रंगला उदात्त ! भाव मनी !!१!!
मूर्त रूप तुझे ! ध्यानी मनी वसे !
विसरू मी कसे ! क्षणोक्षणी !!२!!
कीर्ती तुझी थोर ! मुखी निरंतर !
पसरे सत्वर ! कानोकानी !!३!!
मनाचा गाभारा ! भक्तीची आरास !
एक तुझा ध्यास ! ध्यानीमनी !!४!!
तूंचि भगवंता ! संकटी तारिसी !
मार्ग तू दाविशी ! सर्वज्ञानी !!५!!
©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी