*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम लेख*
*जन्म बाईचा.*..
*कर्तृत्ववान*
बाई असं तुझं येणं
जणू वळीव पाऊस
कधी येतो कधी जातो
आहे कुणा का गं हौस।।
जन्म बाईचा ….खरंच किती वेगवेगळे, विविधांगी अनुभव येतात.जन्म झाल्यापासून ;मुलगीच झाली का येथून तिचा चिवट प्रवास सुरू होतो.काही असतात हौशीवान ,भाग्यवान पण विशेषत्वाने मुलींना नकारघंटाच.अर्थात सामाजिक कारणं महत्वाची त्यासाठी. शिक्षण,कपडे,वस्तू सर्व च बाबतीत मग भेदभाव जाणवतो.
मुलगा शिकावा म्हणून मुलीचं शिक्षण बंद.लवकरच लग्न..
हुंडा द्यावा लागू नये म्हणून तडजोडी..मुलीच्या मनाचा विचार नसेच.पण संसार सुंदर निभवायची,कोंड्याचा मांडा करायची.
घरची गृहछिद्र झाकायची..व मुकाट संसारात आनंद मानायची.असं स्वतःला विसरून जगलं की कुटुंबातील सगळे आनंदात असत.ती तशीच मनात गुदमरत राही…!
पण मला वेगळं सांगायचंय.
हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे.आपण बघतोच आहोत.
मुली पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून जिद्दीने शिक्षण घेत आहे.कष्ट करायची तयारी,पैसे जाणीवपूर्वक जपून वापरत, त्या शहरात मनापासून
नावीन्यपूर्ण विद्याशाखेत उत्तम शिक्षण घेत यशाच्या पाय-या चढत आहेत.मुली असून स्वाभिमान जतन करायला शिकत आहेत.शिक्षणाने एक आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला, आणि स्वतःचे निर्णय ,मग नोकरी,लग्न त्या स्वतःविचारांती घेतात, प्रसंगी पालकांनाही आपले म्हणणे मुद्दे सूद सांगतात.लग्नाआधीही शिक्षण जाँबसाठी परदेशात एकटीने राहतात, सर्वांशी मिळून मिसळून जीवनातील सर्व वाटचाल आत्मविश्वासाने
चालतात.ही यशाची पावलं संस्कारांनी मजबूत असतात.
त्यांची गरूडझेप त्या स्वतः
सिध्द करतात.व यशश्री त्यांना माळ घालते.
विवाह हीच इतिकर्तव्यता नाही ,हे लतादीदी सारख्या अनेक नामवंत व्यक्तींनी दाखवलं आहे.इतिहास काळातही ,सती न जाता राज्यासाठी , राज्य कारभार चालवणा-या रणरागिणी होत्या. सावित्रीबाईनी अनेक वाईट सामाजिक प्रथा ना विरोध करून मुलींना शिक्षित केलं.केवढे कर्तृत्व, आणि उपकार.
त्यासाठी हवी मनाची शक्ती,खंबीरपणा आणि नेतृत्व गुण!
अनेक महिलांनी परिस्थितीला शरण न जाता स्वकर्तृवाने
आपले यश सिध्द करून दाखवले.अपंग ,अनाथांनी अचाट सामर्थ्य दाखवले.
फक्त स्रियांनीही आपण मुलगी आहोत,आपल्या नशीबी हेच भोग असणार,ही भावना कुटुंबातूनच यथोचित संस्कारातून नाहिशी करावी.समान शिक्षण ,समान संस्कार द्यावेत मुलांना, ज्यामुळे घरी सासरी जाणारी मुलगी व घरी येणारी सून आपापल्या गुणांनी घर उजळून सगळ्यांची मनं जिंकेल.
बदल होत आहेत ,आपणही बघतच आहोत.चला तर बाईची उज्वल भवितव्याची वाट सुखकर यशस्वी होताना बघू या….!
🎉💫💫🎉💫💫🎉💫💫अरूणा दुद्दलवार दिग्रस
यवतमाळ✍️
Advt
Web link
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*