देवगड :
आज आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून ते देवगड मध्ये येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आरूढ झाल्यापासून कोकणकडे निधीचा ओघ लागला आहे.
आमदार नितेश राणे यांनी अनेक प्रकल्प व अनेक विकास कामे मंजूर करून आणले आहेत. यापूर्वीच देवगड साठी मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. देवगड मधील आमदार संपर्क कार्यालयात त्यांनी तीन वाजता पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे. यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या पत्रकार परिषदेला निमंत्रितांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.