You are currently viewing देवबाग येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

देवबाग येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मालवण

देवबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या अशोक शांताराम आरेकर (वय-६५) रा. विक्रोळी मुंबई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- विक्रोळी- मुंबई येथील आरेकर कुटुंबीय ३१ ऑक्टोबर रोजी देवबाग येथे पर्यटनासाठी आले होते. देवबाग येथील साळगावकर रिसॉर्ट येथे वास्तव्यास होते. काल रात्री अशोक आरेकर हे जेवण आटोपून बाहेर फेरफटका मारत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण अधिक तपास करत आहेत. अशोक आरेकर यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा