You are currently viewing आई

आई

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*🙏 आई 🙏*

आई तुझी आठवण
नऊवारीच्या झोकात
गोठ, तोडे, पोहेहार
नथ मोत्यांची नाकात !!

आई तुझी आठवण
मोगरीच्या हारामधे
लांब केसांचा अंबाडा
निशीगंधी वेणीमधे !!

आई तुझी आठवण
बागेतल्या झाडांमधे
किती विविध फुले ही
तुझ्या ग परडीमधे !!

आई तू ग अन्नपूर्णा
तुझ्या हाता चव खास
लाडू चिवडा चकली
थालिपीठ खरवस !!

आई तुझी आठवण
ओवी, गाणी,अभंगात
झंकारती सूर तुझे
टाळ, पेटीच्या नादात !!

आई तुझी आठवण
पंढरीच्या वारीमधे
बुक्का, तुळशीची माळ
टाळ घेई गळ्यामधे !!

आई तुझी आठवण
रांगोळीच्या ठिपक्यात
रेषा रेषा जोडी हेच
तुझे संसारी गुपित !!

आई तुझी आठवण
व्यंकटेशाच्या स्तोत्रात
संस्कारांचे धन देई
लेकरांच्या पदरात !!

पुन्हा पुन्हा जन्म मिळो
आई तुझ्याच कुशीत
मागणे हे एक देवा
आशीर्वाद दे झोळीत !!

ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८

Advt

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*
*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा