निलेश राणेंकडून आर्थिक मदत कुटुंबाच्या स्वाधीन
सिंधुदुर्ग
वराड येथील कै. बाळकृष्ण भगत यांचे काही दिवसांपूर्वी दिर्घ आजापणामुळे निधन झाले होते. यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी आज भेट घेऊन कुटुंबाला आधार दिला. यावेळी आर्थिक मदत देखील त्यांच्या पत्नी यांच्या स्वाधीन करण्यात आली. तसेच पुढेही दर महिन्याला काही ठराविक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सुद्धा आश्वासन दिले.
यावेळी संजू परब, बाबा परब, विशाल परब, शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगावकर, बबन पांचाळ, डॉ. प्रथमेश वालावलकर, बाळा मसुरकर, जगदीश परब, रुपेश पाटकर, आशिष हडकर, हनुमान सरमळकर, शुभम मसुरकर तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते