You are currently viewing अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांचे युथ लीडरशिप शिबिरास मार्गदर्शन

अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांचे युथ लीडरशिप शिबिरास मार्गदर्शन

कणकवली :

 

गोपुरी आश्रम वागदे कणकवली येथे अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र मार्फत युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सला दिनांक २८ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी युवा नेतृत्व कशा स्वरूपाची असावी याबाबत विविध ऍक्टिव्हिटी आणि काही व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून अनुभव शिक्षा केन्द्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांनी मार्गदर्शन केले. क्रिटिकल थिंकिंग याबाबत युवकांची मते घेतली. आपली विचार करण्याची पद्धत कशा प्रकारची असते, यामध्ये आपण जे एखाद्या विषयावरती विचार करतो आणि क्रिटिकल विचार कसा करू शकतो हे सांगितले. शिबिराच्या पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही दिवशी सचिन नाचणेकर यांनी लीडरशिप युवकांपर्यंत पोहोचवली.

दिनांक ३० सप्टेंबरला आपले संविधान याबाबत जिल्हा प्रशिक्षक साताराचे सरस्वती शिंदे यांनी माहिती दिली. त्यांनी संविधान प्रस्ताविका आणि मूल्यांची विविध ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून युवकांसमोर ओळख करून दिली.यावेळी युवकांमधूनही विविध प्रकारची चर्चा होत गेली. देशाचा विचार करत असताना युवक कुठेतरी मूल्यांच्या आधारे घडावा हा उद्देश अनुभव शिक्षा केंद्राचा आहे. यावेळी अनुभव शिक्षक केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक आसमा अन्सारी, सहदेव पाटकर, किशन, दरक्षा शेख, उषा आणि आरजू शेख उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा