You are currently viewing विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवावा- निलीमा सावंत

विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवावा- निलीमा सावंत

मालवण

आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वीतेसाठी झोकून देवून काम करणे गरजेच आहे. तुमच्या यशस्वीतेतूनच शाळेचा नावलौकिक वाढणार आहे. यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी सभापती आणि आचरा हायस्कूल स्कूल समिती अध्यक्षा निलीमा सावंत, यांनी आचरा येथे केले.

मुंबई विद्यापीठ पंचावन्न व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या आचरा कॉलेजच्या विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचा न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल समिती तर्फे आचरा हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांच्या समवेत स्कूल समितीचे अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे,, बाबाजी भिसळे, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,, उपमुख्याध्यापक घुटूकडे,कॉलेजचे प्राचार्य दळवी, भावना मुणगेकर,, सौ रावले यांसह अन्य मान्यवर शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी समई नृत्याने राज्यस्तरावर आचरा कॉलेजचा नावलौकिक वाढवून तृतीय क्रमांक मिळविलेले सर्व स्पर्धक त्यांचे मार्गदर्शक यांचा स्कूल समिती तर्फे सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा