नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेधले होते आम. नितेश राणे यांचे लक्ष
कणकवली
कणकवली शहरातील पटकीदेवी ते नागवे रोडची दुरावस्था झाल्याने त्रिपुरारी पौर्णिमे पूर्वी हे काम तात्काळ करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली शहर भाजपच्या वतीने देण्यात आल्यानंतर त्याची गांभीर्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेतली. तसेच याबाबत तातडीने कार्यकारी अभियंत्यांना सूचना देत पटकीदेवी ते स्वयंभू मंदिर पर्यंतच्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात आले.
कणकवली शहर भाजपाच्या वतीने चार दिवसांपूर्वी पटकीदेवी ते नागवे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत उपकार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर हे काम मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी आम्हाला मंजुरीचे आदेश नकोत. तर प्रत्यक्षात काम केव्हा करणार ते सांगा. त्रिपुरारी पौर्णिमे पूर्वी पटकी देवी ते स्वयंभू मंदिर पर्यंत चे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडु असा इशारा देण्यात आला होता. भाजपचे किशोर राणे, शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांचे देखील लक्ष वेधले होते. तर आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सदर कामाबाबत तातडीने कार्यवाहीची मागणी केली होती. त्यानुसार लगेचच आज सोमवारपासून या कामाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. याबद्दल भाजपच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कार्यकारी अभियंत्यांचे देखील लक्ष वेधले होते. नरडवे रोडवरील खड्डे देखील तातडीने बुजवा अशा अशी मागणी नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी केली होती. त्यावर येत्या आठ दिवसात नरडवे रोडवरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन कार्यकारी अभियत्यांनी दिल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिली.