देवगड
तालुक्यातील ब दर्जा प्राप्त आदर्श ग्रंथालय असलेल्या मुक्तद्वार सागर वाचनालय तांबळडेग (रजि) या ग्रंथालयाचा ९४ वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निवतकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्यव्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम,दत्ता नावगे,वामन मोंडकर,पांडुग कोंळबकर,शंकर भाबल,सुभान कोंळबकर,ग्रंथालय अध्यक्ष दिगंबर येरागी,उपाध्यक्ष प्रभाकर राजम,सरचिटणीस रश्मी कांदळगावकर,विलास सनये,अंतर्गत हिशोब तपासणीस विष्णू धावडे,सुलोचना नरेंद्र राजम आदी
मंचावर उपस्थित होते.
गावातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनात्मक खेळ पार पडले यामध्ये हर्षिदा शिवचंद्र धुरी, आर्यन मोहनदास प्रभू,मंत्रा नितिन कोळंबकर आदींनी यश मिळविले त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,
यावेळी स्वरसंध्या गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये
रत्नाकर राजम,नितीन कोळंबकर,श्रीकृष्ण राजम,प्रभाकर राजम,रश्मी कांदळगावकर,पद्माकर राजम,ओंकार सारंग आदींनी सहभाग घेतला होता,
ग्रंथालय परिसरात विद्युत रोषणाईसह,समृद्धी धुरी.माधवी प्रभू, आकांक्षा सारंग,तृप्ती कोंळबकर यांनी काढलेल्या रांगोळी सह दीप प्रज्वलित केल्याने ग्रंथालय परिसर उजळून निघाला होता,मंत्रा नितिन कोळंबकर हिने नृत्य सादरीकरण केले,
यावेळी रवींद्र कांदळगावकर,मधुकर कुमठेकर,गंगाराम निवतकर,मनोहर केळुसकर,चंद्रशेखर उपाणेकर,विशाल कोंळबकर राजेंद्र येरागी,प्रफुल्ल वेंगुर्लेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विष्णू धावडे यांनी केले तर आभार विलास सनये यांनी व्यक्त केले,
फोटो ओळ:
तांबळडेग मुक्तद्वार सागर वाचनालय येथे दीप प्रज्वलन करताना सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निवतकर,अध्यक्ष दिगंबर येरागी,प्रभाकर राजम,विलास सनये,विष्णू धावडे,वामन मोंडकर आदीसह ग्रामस्थ