You are currently viewing दोडामार्गातील उद्योजक विवेकानंद नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

दोडामार्गातील उद्योजक विवेकानंद नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

दोडामार्ग :

 

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाणी पुरवठा करणारी विंधन विहिर गेल्या काही दिवसांपासून गाळाने भरून आतील मोटार पंप खराब झाला होता. त्यामुळे दोडामार्ग रूग्णालयातील रूग्णांची पाण्याअभावी मोठी गैरसोय होत होती. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली होती. विंधन विहीर पंप नवीन बसवायला वेळ लागणार होता त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी अखेर सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विवेकानंद नाईक यांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पंप देण्यास सांगितले आणि काही क्षणात नवीन मोटार पंप उपलब्ध करून दिला. त्यामुळे दोडामार्ग रूग्णालय पाणी समस्या दूर झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रूग्णांचे नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले. सामाजीक बांधिलकी जपत विवेकानंद नाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याची झलक दाखवून दिली.

दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात पाणी पुरवठा करणारी विंधन विहीर गाळ साचून पंप खराब झाला होता. त्यामुळे रूग्णालयात पाणी पुरवठा बंद झाला होता त्यामुळे बांधकाम विभाग तहसीलदार यांचे लक्ष नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वेधले होते. विंधन विहीर साफसफाई करण्यासाठी संबंधित बोअरवेल साफ करणारी मंडळी यांना बोलावून ती साफ करून घेतली नंतर विवेकानंद नाईक यांनी दिलेला मोटार पंप विंधन विहीर मध्ये उतरून पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा