वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडीतील ऊस शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुक्याचे गट ऑफिस कार्यालय सोयीच्या ठिकाणी पुढील दहा दिवसात सुरू केले जाईल. असे आश्वासन डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी उंबर्डे येथील मेळाव्यात दिले आहे. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे याचा आनंद आहे. शेतकऱ्यांना वेळेत बिले द्या असे आदेश कारखान्याचे चेअरमन, मंत्री बंटी पाटील यांचे आहेत. शेतकऱ्यांचा ऊस हा पाळीपत्रकाप्रमाणे तोडला जाईल. एफआरपी पेक्षा हा कारखाना जास्त दर शेतकऱ्यांना देत आहे. पाळीपत्रकाची यादी गटावर दिली जाईल. सध्या गट ऑफिस करूळ येथे आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी सुरू केले जाईल. एन्ट्री ची सवय ही शेतकऱ्यांनीच लावली आहे. शेतकऱ्यांनी ऊस प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला पाहिजे. ऊसाला पाणी वेळच्यावेळी द्या. कोकणातील शेतकऱ्यांनी एकरी 25 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध शेती करा असे पाटील यांनी सांगितले.