कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मा.संपर्क मंत्री आदरणीय सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय शशांक बावचकर यांच्या सूचनेनुसार प्रविण अर्जुन वरुणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी MIDC रेस्टहाऊस कुडाळ येथे प्रविण वरुणकर यांना दिले.
यावेळी प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर यांच्या हस्ते पुष गुच्छ देऊन प्रविण वरुणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अभय शिरसाट, संदरवल्ली पडीयाची, डाॅ.मयूर शारबिद्रे, गोविंद कुंभार इत्यादी उपस्थित होते.