You are currently viewing डोक्यावर माणावण्याने प्रहार केल्यामुळे नेमळे येथे एक गंभीर जखमी…

डोक्यावर माणावण्याने प्रहार केल्यामुळे नेमळे येथे एक गंभीर जखमी…

कंदील न लावल्याने दोन भावासह मुलांमध्ये मारामारी; सावंतवाडी पोलीसात गुन्हा…

सावंतवाडी

कंदील न लावल्याच्या कारणावरुन नेमळे येथे दोघा सख्या भावांसह त्यांच्या दोन मुलांनी मारामारी केली. यात डोक्यावर माणावणे (फळी आणि दांडा असलेले भात गोळा करण्याचे साधन) मारल्यामुळे चंद्रकांत भगवान मुननकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालात हलविण्यात आले आहे. हा प्रकार काल दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास नेमळे-पाटकरवाडी येथे घडला. दरम्यान या प्रकरणी जखमीचा मुलगा भगवान याने दिलेल्या तक्रारीनुसार गुरूनाथ मुननकर, राजेश मुननकर आणि गौरव मुननकर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहीती सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

त्याच्या म्हणण्यानुसार कंदील न लावल्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे. यात दोघे जण जखमी आहेत. त्यातील एकाच्या डोक्यावर मांडणे मारल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत आहे. तर दुसरा जखमी प्रथमतः आपण दुचाकीवरुन अपघात होवून पडलो, असे सांगत होता. काल रात्री हे प्रकरण सुरू असताना त्याने आमच्या समोर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. मात्र समोरच्या काकाने तक्रार दिल्यामुळे आपल्याला “त्या” काकानेच मारहाण केली, असा आरोप करत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. यावेळी हा त्याचा बनाव असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर जखमीच्या म्हणण्यानुसार माझ्या वर हल्ला करत असताना त्याच्याच वडलांनी माझ्यावर केलेला वार चुकून त्याच्यावर बसला. त्यात त्याला दुखापत झाली, असे सांगितले. ही सर्व प्रकीया कीचकट आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान याबाबत भगवान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा