वैभववाडी प्रतिनिधी :
ग्राहक पंचायतचे संस्थापक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी सांगितलेल्या तत्वाने कार्यकर्त्यांनी समाज शरणवृत्तीने कार्य करावे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सात दिवस फेसबुक व यु ट्यूबवर चालणाऱ्या अभ्यास वर्गाचे उद्धघाटन राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचा उध्दाटन समारंभ संपन झाला. नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. बाबासाहेब जोशी यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन अभ्यासवर्गाचे उदघाटन झाले.आपल्या मनोगतात प्रा. जोशी म्हणाले की ग्राहक चळवळीतील विचार हे स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जयप्रकाश नारायण यांचे तत्वज्ञानाशी निगडित आहेत.कार्यक्रमच्या सुरुवातीला कोमल जैन हिने ग्राहक गित म्हटले.
विदर्भ विभाग अध्यक्ष शाम पात्रीकर,कोकण विभाग अध्यक्ष प्रा. एस.एन. पाटिल, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मेघाताई कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत व महिला संघटन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात देखील ग्राहक पंचयातचे कार्य अविरत सुरु आहे. ऑनलाइन मीटिंग द्वारे आपण संवाद साधु शकतो.समाज व ग्राहक प्रबोधन करणे कार्यकर्त्यांनी मनात ठासुन घेतले पाहिजे. ग्राहक सेवा हे विष्णु कार्य आहे. ग्रहकांपर्यंत आपण पोहचले पाहिजे. जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकर्त्यांना संघटनेची मुल्ये सागींतली पाहिजे. केवळ वस्तु स्वस्त मिळवून देणे हे ग्राहक पंचायतचे कार्य नाही, तर शोषणमुक्त समाज निर्मिती झाली पाहिजे. ग्राहक पंचायतचे लक्ष्मी नारायण हे दैवत आहे. त्यासाठी महिलांचा सहभाग वाढविण्याचे आवहान मेघाताई यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केला. त्यांनी कोरोनाचे आपत्तीमुळे आपणास सर्वांना ऑनलाईन पद्धतीने एकत्रित आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांचे प्रेरणेने स्थापन झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था खऱ्या अर्थाने समाजशरण वृत्तीने कार्य करते आहे, असे सांगून कार्यकर्त्यांनी समाजासाठी आपण देणे लागतो याच वृत्तीने वृतस्थ राहून कार्य केले पाहिजे. तसेच यापुढील सर्व तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने अवश्य ऐकावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हाध्यक्ष मनोज जैन तर सूत्रसंचालन नाशिक विभाग संघटक अरुण भार्गवे यांनी केले. महेश चावला यांनी तांत्रिक बाजू सांभळली. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील साधक कार्यकर्ते व ग्राहक यांनी हजेरी लावली.