You are currently viewing तीर्थक्षेत्र कुणकेश्वर देवस्थान परिसर विकसित करण्यासाठी निधी मिळावा..

तीर्थक्षेत्र कुणकेश्वर देवस्थान परिसर विकसित करण्यासाठी निधी मिळावा..

आ.नितेश राणेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी..

कणकवली

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री देव कुणकेश्वर देवस्थान परिसरात सर्वांगीण विकास व्हावा.पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे तसेच मंदिर परिसर सुशोभिकरण करणे गरजेचे आहे,त्यासाठी निधी मिळावा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.त्यावर तातडीने मुखमंत्र्यानी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांना सुद्धा यासंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली मतदारसंघातील श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान तसेच,श्रीदेव काशी विश्वेश्वर मंदिर ता. देवगड हे कोकण तिर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी मोठया प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे तसेच मंदिर परिसर सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. तरी याठिकाणी पर्यटन दृष्ट्या गावच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना नितेश राणे यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा