You are currently viewing संगोपन लोक संस्कृतीची जोपासना

संगोपन लोक संस्कृतीची जोपासना

महेश काणेकर; सौ. विशाखा सावंत यांच्या ” संगोपन “पुस्तकाचे प्रकाशन

कणकवली

तालुक्यातील कळसुली, दिंडवणे वाडी तील सौ. विशाखा विवेकानंद सावंत यांच्या (पारंपरिक फुगडी गीते, लग्न गीते,ओव्या यांचे समावेश असलेल्या “संगोपन” या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन ललित लेखक आणि विचारवंत
महेश काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कवी उदय केशव सर्पे , सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते कळसुली दिंडवणे वाडी ग्रामस्थांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला,

फुगडी, लग्न गीते, ओव्या म्हणजे भारतीय पवित्र संकृतीची जोपासना असून “संगोपन” या गित संग्रहाने त्याची जोपासना केली असल्याचे उद् गार महेश काणेकर यांनी काढले.
तसेच जेष्ठ कवी उदय सर्फे यांनी “संगोपन “च्या कवियत्री सौ. विशाखा सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांनी आपल्या कविता सादरीकरण करुन सर्वाना मंत्र मुग्ध केले.
या कार्यक्रमास दिंडवणे वाडितील जेष्ठ निवृत्त प्रार्थमिक शिक्षक जयवंत विष्णू कुळकर्णी यांनी कवियत्री बाबत कौतुक केले, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमात कणकवली येथील प्रकाश कदम, रहिवासी श्री. आचरेकर,सुभाष जनार्दन कदम (निवृत्त रेल्वे अधिकारी), सौ. गुलाब हरड या उपस्थित होत्या. या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकर्ती सौ. पुजा सावंत याही हजर होत्या, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच दिंडवणे वाडितील महिला वर्ग व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वंभर विवेकानंद सावंत यानी कले,या वेळी सावंत कुटुंबियांकडुन सर्व जेष्ठ मान्यवरांचे शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी कवियत्री सौ. विशाखा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच सर्वांसमोर फुगडी गीत म्हणून दाखविले,

अखेरीस आभार प्रदर्शन श्री. विश्वंभर सावंत यांनी केले, अशा प्रकारे छोठे खानी पुस्तक प्रकाशन सोहळा कळसुली दिंडवणे वाडी ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी श्री. विवेकानंद सावंत यांनी विशेष परीश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा