मालवण
भारतातील पर्यावरण धोरणात गेल्या काही वर्षात झालेल्या बदलाचे प्रतिबिब महासागर तसेच सागरी किनाऱ्या संदर्भातील नजीकच्या वर्षांत घेण्यात आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरणात तसेच सरकारी कार्यक्रमांतही आढळून येत असल्याने याबाबत समाजाशी निगडित असलेल्या संबंधितांना माहिती देण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या दिल्ली फोरमच्या युथ फॉर कोस्ट प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
भारतात गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय धोरणात कमालीचा बदल झाला आहे. ह्याचे प्रतिबिंब महासागर तसेच सागरी किनाऱ्या संदर्भातील नजीकच्या वर्षांत घेण्यात आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरणात तसेच सरकारी कार्यक्रमांतही आढळते. म्हणून मच्छीमार तसेच मच्छीमारी संदर्भात काम करणाऱ्या समुदायांना या धोरणांची माहिती देणे तसेच त्यातून येऊ घातलेले बदल त्याचे विविध पातळीवर तसेच निसर्गावर होणारे परिणाम या संदर्भात जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे. तसेच या विषयावर काम करण्यासाठी सामूहिक बांधणी करणे गरजेचे आहे, जे समूह मच्छीमार समुदायाला सर्व स्तरावर माहिती पुरवणे आणि समर्थनाचे काम करतील ज्यामुळे हे समुदाय निसर्ग, किनारे, उपजिविका यावर होणाऱ्या परिणामांच्या आकलनातून निर्णय घेण्यास सक्षम बनतील. युथ फॉर कोस्ट मधील सहभागी व्यक्तींना जटिल सामाजिक-परिस्थितीकीय पाणी आणि जमीन माहिती आणि संसाधने याने सुसज्ज केले जाते. ही सत्रे अशा प्रकारे आखली जातात की त्यातून सह-अध्ययन, फिल्ड भेटीतील सहभाग, स्थानिक समुदायाच्या नेत्यांशी संवाद, समुद्र किनाऱ्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या अभ्यासक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा याचा यात समावेश होतो. सहभागी व्यक्तींना राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर समुद्र किनाऱ्याशी संलग्न विषयावर काम करणाऱ्या चळवळी/संस्था, द्रुष्टीकोन आणि धोरणे यांची ओळख करून दिली जाते, ज्यामुळे धोरणात्मक बदलांचा त्यांच्या स्थानिक मच्छीमार समुदायावर होणारा परिणाम समजण्यास शक्य होऊन ते स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य त्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. या प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने ९ (नऊ) सागरी किनाऱ्यावरील राज्यातील रहिवासी, महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्यांना महाराष्ट्राशी संलग्न विषयावर काम करायचे आहे. अशा २२ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींनी अर्ज केले होते. ज्या मधून २० जणांची निवड करण्यात आली आहे . यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान गोरेगाव मुंबई येथे पार पडणार आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हावासियांकडून ऐश्वर्य मांजरेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .