You are currently viewing माजगाव येथील त्रिमूर्ती मित्रमंडळातर्फे २८ ला दीपावली शोटाईम

माजगाव येथील त्रिमूर्ती मित्रमंडळातर्फे २८ ला दीपावली शोटाईम

सावंतवाडी

माजगाव दत्तमंदिर येथील त्रिमुर्ती मित्रमंडळ यांच्या वतीने शुक्रवार दि.२८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता “दिपावली शो टाईम” भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.

रेकॉर्ड डान्स स्पर्धे साठी खुला गटासाठी प्रथम पारितोषिक ७७७७/-रु., द्वितीय पारितोषिक ५५५५/-रु., तृतीय पारितोषिक ३३३३/-रु. उतेजनार्थ पारितोषिक ५००/-,बाल गटासाठी प्रथम पारितोषिक ५०००/-रु., द्वितीय पारितोषिक ३०००/-रु., तृतीय पारितोषिक २०००/-रु. उतेजनार्थ पारितोषिक ५००/-,पाक कला स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक

२५००/-रु., द्वितीय पारितोषिक १५००/-रु., तृतीय पारितोषिक १०००/-रु. उतेजनार्थ पारितोषिक ५००/- अशी आहेत अधिक माहिती साठी प्रशांत मोरजकर(9423301789), सचिन मोरजकर (9421111616),राजन परब (9423836723)

प्रतिक्रिया व्यक्त करा