दिवाळी निमीत्त हाॅस्पीटल नाका कला – क्रिडा मंडळ , वेंगुर्ले च्या वतीने दिनांक २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ” दिपावली शो टाईम २०२२ ” चे आयोजन हाॅस्पीटल नाका येथे करण्यात आले असून या शो टाईम चे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले . तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक विधाता सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व रंगमंचाचे उद्घाटन व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवस , उपाध्यक्ष अॅड. मनिष सातार्डेकर , मनीषा कोल्ड्रींक चे दिनेश तानावडे , प्रशांत मेडिकल चे प्रशांत नेरुरकर , सुरेंद्र चव्हाण , शाम कौलगेकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व भुषण सारंग , माजी नगरसेवक मनिष परब व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रसंन्ना देसाई यांनी मंडळाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना , भविष्यात ह्या मंडळाने फक्त सांस्कृतिक कार्यक्रम न घेता सामाजिक उपक्रम आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली . तसेच वेंगुर्ले तालुक्यातील एक आदर्श मंडळ म्हणून नावलौकिक मिळावा असे कार्य मंडळाच्या हातुन घडावेत अशी सदिच्छा व्यक्त केली .तसेच रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर असे समाजाभिमुख उपक्रम या मंडळाने आयोजित करावे व त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करेन असे अभिवचन दिले .
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गवस व मंडळाचे पदाधिकारी यांनी मान्यवरांचे स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले . यावेळी राहुल वेंगुर्लेकर , आनंद कळेकर , महेंद्र गावडे , रामचंद्र सावंत , जयंत सावंत , मनीष कळेकर , प्रफुल्ल सावंत , सिद्धेश मांजरेकर , रुपेश सावंत , सचिन मांजरेकर , सौरभ भोसले , ॠतीक गवस , कौस्तुभ मयेकर , परमानंद नार्वेकर , अॅड.प्रकाश बोवलेकर , प्रशांत गावडे , करण निरावडेकर , आसीफ खान , निखिल शिरोडकर , तेजस कुडाळकर , खुशाल निरवडेकर , मुकुल सातार्डेकर , शशांक मडकईकर , मकरंद होळकर , सुभाष सोनुर्लेकर , तेजस धुरी , अद्वैत बोवलेकर ,कौस्तुभ गवस , जितेंद्र धुमक इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोवेकर यांनी केले . चार दिवस चालणारया या शो टाईम मध्ये दांडीया नृत्य , जिल्हास्तरीय रेकाॅर्ड डान्स स्पर्धा , सत्यनारायणाची पूजा व नाटक तसेच महिलांसाठी होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.